शिंदे-फडणवीसमध्ये दुरावा? मुख्यमंत्र्यांकडून खुलासा

म्हणाले...आमचे संबंध अजूनही मजबूत

-नाराजीच्या चर्चांवर पडला पडदा
मुंबई / 26 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांमुळे सध्या राजकीय वर्तुळ गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकींना अनुपस्थित राहिले होते. ज्यामुळे या चर्चांना उधाण आले. पण त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, माझं आणि एकनाथ शिंदे यांचं नातं चांगलं आहे. आमच्यात कोणताही दुरावा नाही. कोणीही आमच्यात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असला तरी काहीच होणार नाही. आम्ही सोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केली होती, तसेच विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत राज्यातील विविध आणि केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयश झाल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सह्याद्रीवर आढावा बैठक बोलावली, जिथे शिंदेंनी अनुपस्थित राहून चर्चांना इंधन दिले होते.
याबाबत एकनाथ शिंदे यांनी सांगितले, आमच्याकडे नगरविकास खातं आहे, पण इतरही खाते आहेत. आम्ही फक्त विकासाच्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राचा जीडीपी, स्टार्टअप, उद्योग क्षेत्र हे सर्व टॉपवर आहेत. आम्ही फक्त राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आणि या माहितीला खोटं ठरवत म्हणाले, ही चर्चा फेटाळून लावता येतील. शिंदे-फडणवीस यांच्यात कोणताही दुरावा नाही. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आता थोड्याफार शांत झाली आहे, आणि दोन्ही नेत्यांमध्ये संबंध अजूनही दृढ असल्याचा संदेश मिळतो.

संबंधित बातम्या

Back to top button