चाकूसह दहशत माजविणार्‍या तडीपाराला अटक

गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती / 19 ऑगस्ट : तडीपार आरोपी शंकर सुभाष बनसोड (वय 42, रा. भीमनगर) हा हातात लोखंडी चाकू घेऊन परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या त्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी वेळीच आळा घातल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. गाडगेनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच कलम 4, 25 महाराष्ट्र शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button