खा. बळवंत वानखडेंकडून गावोगावी जात नूकसानीची पाहणी

ढगफुटी सदृश्य पावसाने तिवस्यात कहर

-प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
-अनेक गावातील शेतकर्‍यांची शासनाप्रती नाराजी
तिवसा / 17 ऑगस्ट : तिवसा तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकर्‍यांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. शेतजमिनींमध्ये नदीचे पाणी घुसून खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. या संकटग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी रविवारी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करुन पाहणी केली.
बळवंत वानखडे यांनी पिंगळाई नदी परिसर, शेंदूरजना बाजार, जाफरापूर, मोझरी, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधुर, वाठोडा, डेहनी, निंभोरा, भांबोरा, वरखेड, तारखेड या गावांना भेट देऊन शेतकर्‍यांचे दु:ख ऐकले. घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांना धीर दिला. जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी व वीज वितरण अधिकार्‍यांना पंचनामे करून तत्काळ अहवाल शासनाकडे पाठवण्याचे आदेश खासदारांनी दिले. पोखरा योजनेतील गावांमध्ये बांधबंदिस्तीची गरज लक्षात आणून देत सरपंच व सचिवांना तातडीने प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या.
तिवसा-शेंदूरजना बाजार रोडलगत शेतांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने पिकांचे झालेले नुकसान पाहून सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी खासदारांनी केली. पालवाडी गावात साचलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांना उचलावे लागलेले हाल बघून ग्रामविकास अधिकार्‍यांना कार्यवाहीचे आदेश दिले. दरम्यान, निंभोरा येथील शेतकर्‍यांनी निवडणुकीपूर्वी मंजूर झालेल्या पांदन रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याबाबत खासदारांकडे नाराजी व्यक्त केली. वानखडे यांनी प्रशासनाशी चर्चा करून लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
खासदारांच्या या दौर्‍यात काँग्रेस, सहकार क्षेत्र व स्थानिक स्वराज्य संस्थांचे असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश साबळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश मेटकर, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष वैभव वानखडे, अभिजीत बोके, प्रदीप बोके, बाजार समिती सभापती रवी राऊत, शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमुख, कार्याध्यक्ष सुनील बाखडे, किशोर दिवे, शरद वानखडे, गजानन अळसपुरे, मुकुंद पुनसे, जसबीर ठाकूर, सतीश पोजगे, लोकेश केने, दीपक सावरकर, जितेंद्र चौधरी, किशोर चौधरी, बाळासाहेब घुरडे, सिद्धार्थ खांडेकर, मारोतराव वाघमारे, वैभव ढवळे, प्रफुल उमप, नरेंद्र विघ्ने, किसन मुंदाने, योगेश वानखडे, प्रणव गौरखडे, प्रमोद वानखडे, नितीन मेहकरे, संजय चौधरी, विशाल सावरकर, अजिंक्य चौधरी, हरिदास भगत, अतुल खुळे, सुनील राऊत, प्रफुल गंधे, गजानन भोंबे, प्रफुल वानखडे, दिनेश वानखडे, अनिल चोरे, पंकज कळंबे, राजू देशमुख, दिवाकर भुरभुरे, सरपंच सुरज धुमनखेडे, सचिन वानखडे, देवदत्त खोंडे, परिक्षित बोके, अनिकेत तालन, वैभव बोके, सागर राऊत, वैभव काकडे, अनंत शेंद्रे, तुषार लेवटे, अनिकेत प्रधान, गौरव चौधरी, किशोर गोरडे, चंद्रशेखर ढगे, गजानन गोरडे, नरेंद्र थोटे, बबनराव पुनसे, नामदेवराव तांबे, सुयोग कांडलकर, आशिष बायस्कर, नरेंद्र साबळे, प्रशांत साबळे, दिनेश खरबडे, योगेश साबळे, संजय इंगळे, राजिक शेख, ज्ञानेश्वर गहूकर, यादवराव मुंद्रे, मनोज वाढोनकर, निलेश डागा, रोहन वानखडे, सरजा वाघमारे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button