आसामात हिमंता सरमा पुन्हा होणार मुख्यमंत्री

गुवाहाटी/10 मे-आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड निश्चित केली आहे. पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत त्यांची एकमताने नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ते सलग दुसर्‍यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांचा शपथविधी 12 मे रोजी पार पडणार असून या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी पक्षाकडून विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व आमदारांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाला पाठिंबा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि ते कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. आता नव्या सरकारच्या स्थापनेसह ते पुन्हा अधिकृतपणे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत. आसाम विधानसभेतील निकालांमध्ये भाजपने स्पष्ट वर्चस्व मिळवत मोठे यश मिळवले आहे. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह आघाडीने दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत मिळवले असून राज्यात पुन्हा एकदा मजबूत सरकार स्थापन होणार आहे. हिमंता बिस्वा सरमा यांचा राजकीय प्रवासही तितकाच चर्चेचा विषय राहिला आहे. कळारपींर इळीुर डरीार विद्यार्थी चळवळीमधून राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केले. राज्यातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी प्रभावी प्रशासक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र नंतर काँग्रेसमधील मतभेदांमुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या

Back to top button