जोसेफ विजयच्या शपथविधीत राष्ट्रगीत-वंदे मातरमवर वाद

चैन्नई/10 मे- तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ’तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ’जन गण मन’ आणि ’वंदे मातरम’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे. डीएमकेने यावर आक्षेप घेतला आहे. डीएमकेचे म्हणणे आहे की, राज्याच्या सन्मानासाठी तामीळ राज्यगीत सर्वात आधी वाजवले पाहिजे होते, परंतु ते तिसर्‍या क्रमांकावर ढकलले गेले. ही परंपरेच्या विरोधात आहे.यावर विजय यांच्या पक्षाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, गाणी कधी वाजवायची हा निर्णय राज्यपालांचा होता. परंतु डीएमके नेते टी.के.एस. एलंगोवन यांनी म्हटले की, राज्याची परंपरा तामीळ राज्यगीत आधी आणि राष्ट्रगीत शेवटी वाजवण्याची आहे. विजय आता भाजपच्या विचारसरणीकडे झुकत आहेत.विजय यांच्या शपथविधीमध्ये सर्वात आधी 2 मिनिटे 52 सेकंद ’वंदे मातरम’ वाजवले गेले. त्यानंतर 52 सेकंदांसाठी ’जन गण मन’ वाजवले गेले. यानंतर 65 सेकंद तामीळ राज्यगीत वाजवण्यात आले.
शपथविधीत तमिळ राज्यगीत तिसर्‍या क्रमांकावर वाजल्याने उझख, उझखच् आणि तघउ ने देखील टीका केली आहे. उझख चे राज्य सचिव एम. वीरपांडियन म्हणाले की, सरकारी कार्यक्रमांच्या प्रोटोकॉलमध्ये तमिळ राज्यगीताला पहिले प्राधान्य मिळायला हवे. तामिळनाडू निवडणुकांमध्ये विजयच्या पक्षाने 108 जागा जिंकल्या होत्या. विजयच्या सरकारला काँग्रेस, उझख, उझखच्, खणचङ आणि तघउ चा पाठिंबा मिळाला आहे. तर, ऊचघ च्या आयटी विंगने विजयला विचारले की, तमिळ राज्यगीताला बाजूला करणेच ढतघ च्या नवीन बदलाचा भाग आहे का?

संबंधित बातम्या

Back to top button