देणगी चोरी, पेपरफुटीवरून संसद सभागृहात गदारोळ

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी विरोधकांचा गोंधळ,दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित

नवी दिल्ली/20 जुलै -कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे संसदेतही पडसाद उमटले. अधिवेशनात विरोधकांनी नीट पेपरफुटी
आणि राम मंदिरातील चोरी प्रकरणावरून सत्ताधार्‍यांना घेरलं. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर संसदेत गदारोळ झाला. विरोधक आक्रमक झाल्याने अनेक वेळा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच मोदी सरकारला मोठ्या अग्निपरीक्षेचा सामना करावा लागतोय.नीटच्या पेपर लीकवरून सीजेपीनं
दिल्लीतल्या रस्त्यांवर संसदेच्या बाहेर लढाई सुरू केलेली असताना विरोधकांनी मोदी सरकारला संसदेत घेरलंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याची झलक विरोधकांनी दाखवली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी
आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. आंदोलकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी विरोधकांनी मागणी करताच सर्वोच्च सभागृह असलेली राज्यसभा एकदा दोनदा नव्हे तर 4 वेळा तहकूब करण्याची वेळ आली अखेर विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं तर लोकसभेतही विरोधकांनी गोंधळ घातल्यानं 5 वेळा लोकसभा तहकूब करावी लागली तरी देखिल विरोधकांच्या प्रंचड आक्रमक बाण्यामुळे शेवटी लोकसभेचं कामकाजही उद्यापर्यंत स्थगित करण्याची वेळ आली.नीट पेपर लीक आणि प्रधानांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर एकत्र झालेल्या विरोधकांचा रुद्रावतार पाहिल्यानंतर सरकारनं तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी झाले. त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हालचाली सुरू आहेत की काय  चर्चा सुरू झाली. त्यामुळे विरोधकांनीही हा प्रधानांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला.

संबंधित बातम्या

Back to top button