वरिष्ठ आयपीएस अधिकार्याच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापन करा
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा आदेश

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
नवी दिल्ली/20 जुलै -राम मंदिरातील देणगीतील वस्तूंच्या चोरी प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी ही पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणार्या विशेष तपास पथकाची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले. या पथकाचे नेतृत्व एका वरिष्ठ आयपीएस
अधिकार्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले. राम मंदिर चोरी प्रकरणी सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, यासंदर्भातील सद्यस्थितीचा अहवाल दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी न्यायालयाला हेही
सांगितले की तपास सुरू आहे. आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आलीय. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती
जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना सॉलिसिटर जनरल यांना विचारले की सध्या या प्रकरणाचा तपास कोण करत आहे. यावर सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले, सत्य शोधण्यासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डखढ च्या निदर्शनास आले आहे की, हा ’कॉग्निझेबल’ गुन्हा (यात पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात) आहे. यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, आम्ही 3 ते 4 दिवसानंतर याप्रकरणी पुन्हा सुनावणी करतील. त्यावेळी तपासाच्या मुद्द्यावर चर्चा होईल.




