हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले

नितेश राणेंचं धक्कादायक विधान

मुंबई /14 ऑगस्ट : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून नितेश राणे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. नितेश राणे मंत्री झाल्यापासून वादग्रस्त विधान करतच आहेत. आताही त्यांनी पुन्हा एखदा सर्वात धक्कादायक विधान केले  आहे. त्यांनी, ’महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे, अन्य धर्मियांनी मतदान केलंचं नाही, नाही असा दावा केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज कीय वाता वरण तापण्याची शक्यता आहे. ते रत्नागिरीतील चिपळूण मधील रक्षा बंधना निमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. याआधी नितेश राणे यांनी, फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असे वादग्रस्त विधान केलं होते. त्यामुळे सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाली होती. त्यावेळी नितेश राणेंच्या या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावरून थेट इशारा देताना, मुस्लिमांबद्दलची केलेली वक्तव्यं खपवून घेणार जाणार नाही, असे म्हणत कान टोचले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांचे कान टोचले होते.

संबंधित बातम्या

Back to top button