महायुतीत मानापमान नाट्य रंगल

उपमुख्यमंत्री शिंदे, गोगावलेंची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

नवी दिल्ली/12 ऑगस्ट – महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाची दोरी मंत्री अदिती तटकरे यांच्या हातात देण्याचा निर्णय झाल्यामुळे मंत्री भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी दांडी मारली. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीला गैरहजर आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे 10 ऑगस्टला श्रीनगर दौर्‍यावर गेले ते अजून परतलेले नाहीत. तर गोगावले दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत. ते नेमके कोणाच्या भेटी साठी गेले यावरुन चही दिल्ली च्या राज कीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेने (शिंदे) दावा केला आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे (शिंदे) मंत्री भरत गोगावले यांच्यात कित्येक महिन्यांपासून वाद सुरु आहे. अशातच रायगड जिल्ह्यात येत्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर आहेत. तर त्यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मंत्रिमंडळ बैठकील उपस्थित नाहीत. शिवेसेनेचे हे दोन्ही नेते आज महाराष्ट्राबाहेर आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना सन्मान मिळत नसल्याची पक्षात नाराजी आहे, त्यामुळेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्रीनगरचा दौरा वाढवला आहे, अशी चर्चा आहे.राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौर्‍यावर आहेत त्यामुळे ते बैठकीला गैरहजर आहेत. तर पालकमंत्रीपदाचा आग्रह धरलेले भरत गोगावले दिल्लीत आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौर्‍यावरुन तर्कवितर्क लावले जात आहेत. नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button