अहिल्यादेवींचा अपमान, अमरावतीत धनगर समाज संतप्त

जिल्हा कचेरी, पोलीस आयुक्तालयावर धडक

-आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याचा निषेध
-आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमरावती / 21 जुलै : पुण्यातील सुनील गोपाळराव उभे या माथेफिरूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासंदर्भात समाज माध्यमांवर गलिच्छ भाषा वापरत संतापजनक टिप्पणी केली. त्यामुळे धनगर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा अपमान करणार्या सुनील उभे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संतप्त धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर व त्या पाठोपाठ पोलीस आयुक्त कार्यालयावर सोमवारी (ता. 21) धडक देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करित, ‘त्या माथेफिरूवर गुन्हा दाखल करा’, ‘कठोर शिक्षा झालीच पाहिजे.. झालीच पाहिजे..’, ‘निषेध असो निषेध असो सुनील उभेचा निषेध असो’, यासह अनेक घोषणा देत विरोध प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर धनगर समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आले. अ‍ॅड. एडतकर यांनी सांगितले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील व गलीच्छ टिप्पणी करणार्याविरोधात तक्रार केलेली आहे. विशेष म्हणजे 16 जुलै रोजी विधानभवन परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या हाणामारी नंतर पुण्यातील सुनील उभे नामक इसमाने फेसबुक अकाउंटवरुन ही पोस्ट केली आहे.
त्याच्या पोस्टमुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे. आमच्या आदर्शांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, रस्त्यावर उतरुन निषेध करु. प्रशासनाने समाजाच्या भावना समजून घेत त्या माथेफिरूविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर समाजबांधवांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले व सुनील उभे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. यासंदर्भात सुनील उभे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तो संबंधित पोलीस ठाण्याला वर्ग केला जाईल, असे पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले.
निवेदन देताना अ‍ॅड. दिलीप एडतकर, ज्ञानेश्वर ढोमणे, काशीनाथ फुटाणे, बबनराव काळे, शामकांत करडे, श्रीकृष्ण निंघोट, भास्कर ढेवले, साधना म्हस्के, सुषमा पातुर्डे, वंदना एडतकर, जयश्री शहाकार, निता टेकाडे, वर्षा लंबाडे, अमित महात्मे, व्ही. पी. पुनसे, एन.आर. भुजाडे, मुरलीधर लांडे, श्रीकृष्ण गादे, बाळासाहेब कोराटे, संतोष साव, नंदकिशोर काळमेघ, डॉ. संजय गोरे, जगदेव नवरंगे, रामकृष्ण गावनेर, जनार्दन घुरडे, दादाराव उघडे, रामदास काळे, अनिल फुटाणे, मधुकरराव थोटे, घनश्याम बोबडे, प्रकाश वाढे (गुरूजी), बबनराव काळे, महादेवराव रोकडे, विष्णूपंत काळे, निखिल घुरडे, सुभाष धवणे, अविनाश बोबडे, रामभाऊ मुंदाने, मिलिंद अवघड, वामनराव सरोदे, प्रतिभा इसळ, राजेंद्र म्हस्के, अशोक इसळ, उमेश घुरडे, प्रमोद कापडे, रमेशराव ढवळे, दिनेश बांबल, भाष्कर पुनसे, दादाराव उघडे, डॉ. आनंदराव इसळ, वासुदेवराव पाठक, विजय पुनसे, कैलास निंघोट, भाष्करराव ढेवले, रामेश्वर राऊत, जी. पी. राऊत, सुभाष धवणे आदी उपस्थित होते.
प्रत्येक पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. जी भाषा उभे नावाच्या इसमाने वापरली आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती असू शकत नाही. वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती व सावित्रीबाई फुलेंबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचाच आदर्श घेऊन ही पिलावळ आदर्शांना हीन लेखत आहे. राजमाता अहिल्यादेवींनी जे कार्य केले त्यांच्यासारखे कार्य कुणाचेच नाही, असे असताना त्यांचा अपमान करणे हा गुन्हा आहे, अमरावतीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
-अ‍ॅड. दिलीप एडतकर, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते

संबंधित बातम्या

Back to top button