कु.जानवी बारब्दे हिची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी विदर्भ संघात निवड
सिपना महाविद्यालयाची ऐतिहासिक परंपरा कायम

चिखलदरा/23 नोव्हेंबर : सिपना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा येथील बी.एस्सी. भाग1 मध्ये शिक्षण घेणारी प्रतिभावान खो-खो खेळाडू कु. जानवी बारब्दे हिची 45 व्या कुमार गट राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी विदर्भ महिला संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान पारूल युनिव्हर्सिटी, वडोदरा (गुजरात) येथे पार पडत आहे. कु. जानवी हिने मागील दोन वर्षांपासून कुमार गटात अमरावती जिल्हा संघाचे तसेच महाविद्यालयीन संघाचे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. अमरावती जिल्हा संघाला विदर्भ अजिंक्यपद मिळवून देण्यात तिने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. चिखलदरासारख्या दुर्गम व ग्रामीण भागात महाविद्यालयाने 250 पेक्षा अधिक राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावरील कलर कोट खेळाडू घडवून खो-खो क्षेत्रात सुवर्ण इतिहास रचला असून, जानवीच्या निवडीने त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आपल्या या देदीप्यमान यशाचे श्रेय कु. जानवी हिने सिपना शिक्षण प्रसारक मंडळ, अमरावतीचे अध्यक्ष श्री. जगदीशजी गुप्ता, माजी सचिव प्राचार्य डॉ. रवींद्र कडू, सचिव श्री. प्रशांत तायडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जयपुरकर (माजी प्रकुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. प्रशांत गावंडे, विदर्भ खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रा. सुहास पांडे, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश मोदानी, सचिव डॉ. गजेंद्र रघुवंशी, विदर्भ असोसिएशन महासचिव संजय इंगळे,मार्गदर्शक विनोद जनबंधू, विशाल घोरपडे, तसेच मंडळाचे वरिष्ठ खेळाडू राहुल रेवस्कर, किरण माहूरे, विवेक कौडेले, हर्षल इंगळे, देवेश इंगळे, रोशन पिवल, नवीन नांदुरकर, नितीन नांदुरकर, सागर नेतनराव, आशिष भुरे, शैलेश तरजुले, अक्षय भुरे, मुसरलिन उर्फ आशू, सर्वेश इंगळे, राज यादव, वैभव गावंडे, शुभम कडव, ललित देवमुरार, वैभव मांडवगडे, मनोज घोटेकर, नितेश पारदे, मंगेश पाटील आणि आपले आई-वडील यांना दिले आहे.ङ्गराष्ट्रीय स्तरावर विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार्या कु. जानवी बारब्दे हिचे सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.





