33 केव्ही जरीदा उपकेंद्राला भेट आणि पाहणी
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची महावितरणच्या

मेळघाटात सौर योजनांचा लाभ देण्याचे ऊर्जा राज्यमंत्र्यांचे निर्देश
अमरावती /20 नोव्हेंबर -महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व ऊर्जा राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर यांनी मेळघाट दौर्यादरम्यान महावितरणच्या 33 केव्ही जरीदा उपकेंद्राची पाहणी केली. उपकेंद्राची क्षमता 5 एमव्हीएने वाढवून ती 10 एमव्हीए करण्यात आल्याने परिसरातील वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळत असल्याबद्दल तसेच उपकेंद्राच्या स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
अतिदुर्गम व जंगलव्याप्त मेळघाट परिसरासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये 33 केव्ही जरीदा उपकेंद्र नव्याने उभारून कार्यान्वित करण्यात आले असून, या उपकेंद्रासाठी मध्य प्रदेशातून वीज पुरवठा घेतला जातो. सुरुवातीला 5 एमव्हीए क्षमतेच्या या उपकेंद्रात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2026 मध्ये 5 एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. यामुळे परिसरातील ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठ्यासोबतच ’मागेल त्याला वीज जोडणी’ देणे शक्य झाले आहे.या पाहणी दरम्यान राज्यमंत्री बोर्डीकर यांनी मेळघाटातील वीज पुरवठ्याच्या स्थितीबाबत मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच यावेळी ’महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सौर योजना (स्मार्ट)’ आणि ’पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’चे अनुदान व फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवून मेळघाटातील अधिकाधिक नागरिकांना या योजनांत समाविष्ट करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. भेटीदरम्यान त्यांच्या हस्ते उपकेंद्र परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
या प्रसंगी आमदार केवलराम काळे, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंता विकास शहाडे, अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रूपाली माथने, प्रभुदास भिलावेकर, उपकार्यकारी अभियंता निलेश बोरीकर, कनिष्ठ अभियंता अजय टाले, तंत्रज्ञ भारत धुर्वे, प्रियंका मालठाने आदी मान्यवर उपस्थित होते.





