प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण आणि समान संधी मिळावी; अदिती तटकरे यांचे आवाहन
बालहक्कांच्या संरक्षणासाठी कुटुंब, समाज आणि संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन

बालविवाह रोखण्यासह बालसंरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर
मुंबई/19 नोव्हेंबर : प्रत्येक बालकाला हिंसा, शोषण, भेदभाव आणि भीतीमुक्त बालपण मिळणे हा त्याचा अधिकार आहे. यासाठी राज्यातील बालसंरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. जागतिक बालदिनानिमित्त त्यांनी बालहक्कांच्या संरक्षणासाठी कुटुंब, समाज आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. युनिसेफच्या ८० वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गाव आणि शहरी भागातील मुलांपर्यंत संरक्षण यंत्रणा पोहोचवण्याचा संकल्प करण्याचेही त्यांनी नमूद केले.





