पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग

मुंबई/18 नोव्हेंबर- 50 ते 60 दुकानं जळून खाक, पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील जय वल्लभ शाळेजवळ मध्यरात्री 2 वाजून 5 मिनिटांनी लाकडी सामान असलेल्या दुकानांना भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाची जवळपास 27 वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत अंदाजे 50 ते 60 पेक्षा अधिक दुकानांना आग लागल्याची माहिती आहे.





