पाण्याचा अपव्यय करणार्‍यावर कारवाई 5 हजार

5 हजार रूपयांचा दंड

अकोला /17 नोव्हेंबर– अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा अपव्ययावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये झोन निहाय पथके कार्यान्वीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी पश्चिम झोन पथकाव्दारे तपासणी दरम्यान अंतर्गत बाळापूर रोड येथील राठोड वॉटर सर्व्हिसींग सेंटर हे प्रशासनाव्दारा वॉटर सर्व्हिसींग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश दिल्यावरही त्यांचे वॉटर सर्व्हिसींग सेंटर सुरू आढळल्यामुळे त्यांचेवर 5,000/- रूपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.सदर कारवाई मनपा सहा.आयुक्त गजानन घोंगे यांच्या मार्गदर्शनात झाली.

Back to top button