सोनम वांगचुक नजरकैदेत
घराबाहेर डझनभर सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात

लडाख/13 नोव्हेंबर : पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लडाखमधील आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. घराबाहेर डझनभर सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
या प्रकरणावर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2029 पूर्वी सरकार प्रत्येकाला नजरकैदेत, ताब्यात किंवा अटकेत ठेवेल आणि सोशल मीडियाच्या वापरावरही निर्बंध आणेल, असे दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला. वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून डझनभर सशस्त्र सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांच्या घराला वेढा घातला आहे. मात्र, सरकारकडून त्यांना केवळ घरीच राहण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे आपल्यासोबत असे केले जात असल्याचे वांगचुक यांनी म्हटले आहे.





