पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी पतीविरुध्द गुन्हा दाखवा

वरुड / 12 नोव्हेंबर – विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देणार्या पतीविरुध्द वरुड पोलिंसानी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला अल्पवयीन असताना तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी विशाल विजय कळसकर (26) ने फिर्यादीला पांढुर्णा येथे नेऊन घरगुती रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल्याचे तक्रारीत नमुद आहे. या संबंधातून त्यांना चार वर्षांची मुलगी आहे.
दरम्यान, आरोपी विशाल कळसकर व त्याच्या आईकडून फिर्यादीला जातीवरुन अपमानास्पद बोलून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून फिर्यादी मागील तीन वर्षांपासून आपल्या आईकडे राहत आहे. तरीदेखील आरोपी विशाल कळसकर फिर्यादीच्या आईच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत असल्याचे तसेच फिर्यादीला ओढून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी फिर्यादीच्या बहिणीलाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी विशाल विजयराव कळसकर (26) रा.मुलताई चौक, वरुड याचे विरुध्द कलम 64 (2), (उ), 65 (1), 65 (2), 115 (2), 35र्2ें 351 (3) भा.न्या.सं.2023 सहकलम 4, 6 बाल लैंगीक अपराध संरक्षण अधिनियम अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.





