झारखंड सरकारचेे 10 लाखांचे बक्षीस असलेल्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला अटक
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

मुंबई/7 नोव्हेंबर ः ऐन दिवाळीच्या धामधूमीत एटीएसने ठाणे शहरात सर्वात मोठी कारवाई केली आहे. ठाणे एटीएसने झारखंडमधील कुप्रसिद्ध फरार नक्षलवाद्याला अटक केली आहे. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर 10 लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं. ठाणे एटीएसने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात ही कारवाई करत या नक्षलला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती झारखंडमधील जंगल भागातील रहिवासी असून तो गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहत होता. त्याला पकडून देणार्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस झारखंड सरकारने जाहीर केले होते. अशातच एटीएस कारवाई करत त्याला अटक केली आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती आहे. तर अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव संजय सरोज यादव, ऊर्फ संजय गोडराय, ऊर्फ बुधराम असे असून त्याचे वय 45 वर्षे आहे. एटीएसच्या या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नक्षलवाद्याचा घातपाताचा कट होता का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
ऐन दिवाळीच्या धामधूमीत एटीएसने ठाणे शहरात सर्वात मोठी कारवाई केली आहे. ठाणे एटीएसने झारखंडमधील कुप्रसिद्ध फरार नक्षलवाद्याला अटक केली आहे. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर 10 लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं. ठाणे एटीएसने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात ही कारवाई करत या नक्षलला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती झारखंडमधील जंगल भागातील रहिवासी असून तो गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहत होता. त्याला पकडून देणार्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस झारखंड सरकारने जाहीर केले होते. अशातच एटीएस कारवाई करत त्याला अटक केली आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती आहे. तर अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव संजय सरोज यादव, ऊर्फ संजय गोडराय, ऊर्फ बुधराम असे असून त्याचे वय 45 वर्षे आहे. एटीएसच्या या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नक्षलवाद्याचा घातपाताचा कट होता का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात आरोपीच्या उपस्थितीची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. यानंतर, पथकाने परिसरात कारवाई करून त्याला अटक केली. आरोपी गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहत होता. तो केव्हा आणि कोणाच्या संपर्कात आला हे निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. तिथे राहण्यासाठी त्याने कोणाची मदत घेतली होती, की तो एकटाच राहत होता, हे एटीएस निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, संजय यादवच्या अटकेनंतर, महाराष्ट्र एटीएस आता त्याची चौकशी करत आहे. तो झारखंडमधून महाराष्ट्रात का आला आणि ठाकुर्लीमध्ये राहण्यामागे त्याचा हेतू काय होता, हे तपास यंत्रणेला जाणून घ्यायचे आहे. याशिवाय, तो महाराष्ट्रातील कोणत्याही नक्षलवादी किंवा इतर कारवायांमध्ये सामील होता का, याचाही तपास यंत्रणा करत आहे. गेल्या काही दिवसांतील त्याचे स्थानिक संपर्क आणि हालचालींचीही चौकशी आता केली जाऊ शकते, अशी माहिती आहे.





