नागपुरातील धमकीपत्रांमागे बिश्नोई गँगचा सहभाग?

गृहराज्यमंत्री भोयर यांनी घेतली प्रकरणाची गंभीर दखल

नागपूर /2 नोव्हेंबर: नागपुरातील सराफा व्यावसायिकांना कुख्यात बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पत्रे पाठवून दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे प्रकरण गंभीरपणे हाताळण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. धमकी देणारे प्रत्यक्षात बिश्नोई गँगशी संबंधित आहेत की या गँगच्या नावाचा वापर करून काही जण आपले काम साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, याचा तपास केला जात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. नागपुरात सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.बिश्नोई गँगच्या नावाने आलेल्या धमकीच्या पत्रांमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Back to top button