पेढी नदी पात्रात नऊ वर्षांचा बालक बेपत्ता
दौतपूर गावात शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू

प्रशासन आणि ग्रामस्थांचे संयुक्त प्रयत्न
अमरावती/ 2 नोव्हेंबर ; भातकुली तालुक्यातील मौजा दौतपूर येथील कानफोडी परिसराजवळ पेढी नदीच्या प्रवाहात नऊ वर्षांचा शिवांश निलेश आमझरे हा बालक अचानक पडून बेपत्ता झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून घटनेची माहिती समजताच जिल्हा आपत्ती नियंत्रण विभाग आपदा मित्र पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे मात्र वृत्त लिहेपर्यंत बालकाचा शोध लागला नव्हता व मंडळ अधिकारी धुर्वे साहेब तलाठी गिल साहेब पोलीस पाटील शैलेश बोरकर सरपंच तसेच आपदा मित्र मोहसीन खान आनंद पेठे राहुल कुरवाडे आणि स्थानिक ग्रामस्थ नदीपात्रात उतरून बालक सुखरूप मिळावा म्हणून अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
भातकुली तालुक्यातील दौतपूर गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आज दुपारी कानफोडी परिसराजवळ 9 वर्षांचा शिवांश निलेश आमझरे हा चिमुकला पेढी नदीच्या पात्रात पडून बेपत्ता झाला आणि मुलगा नदीत बुडाल्याची बातमी वार्यासारखी पसरताचगावकर्यांनी नदीकाठावर गर्दी केली व कुटुंबीयांचा टाहो पाहून उपस्थितांचे मन हेलावले त्यामुळे प्रशासनाने वेळ न घालवता तातडीने सूत्रे हलवली आणि शोधकार्याला गती दिली.या शोधमोहिमेंतर्गत प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ जीव ओतून काम करत असून मंडळ अधिकारी धुर्वे साहेब तलाठी गिल साहेब पोलीस पाटील शैलेश बोरकर सरपंच तसेच आपदा मित्र मोहसीन खान आनंद पेठे राहुल कुरवाडे आणि स्थानिक ग्रामस्थ स्वतः नदीपात्रात व आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेत आहेत त्यामुळे चिमुकला लवकरच सुखरूप सापडावा अशी आशा निर्माण झाली आहे.
पेढी नदीत बालकाचा शोध सुरू-पेढी नदीत 9 वर्षीय शिवांश निलेश आमझरे हा बालक बेपत्ता झाल्यापासून प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी नदीपात्रात कसून शोधमोहीम राबवली असून मंडळ अधिकारी धुर्वे साहेब, तलाठी गिल साहेब, पोलीस पाटील शैलेश बोरकर, सरपंच, आपदा मित्र मोहसीन खान, आनंद पेठे, राहुल कुरवाडे यांच्यासह सर्वजण चिमुकल्याला सुखरूप शोधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.





