आयुक्तांच्या दालनासमोर कचराकोंडीवरून पाच तास ठिय्या आंदोलन

सर्वपक्षीय नगरसेवकांची पालिकेत शिदोरी बैठक

दोन दिवसांत लेखी खुलाशाची मागणी

अमरावती /5 ऑक्टोबर- शहरातील कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था आणि आगामी सणासुदीच्या तोंडावर साचलेला कचरा यावरून संतप्त झालेल्या सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांनी थेट पालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या दालनाबाहेर तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन करून पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणला. आंदोलन टाळण्यासाठी आयुक्त दिवसभर कार्यालयात फिरकलेच नाहीत असा थेट आरोप करत लोकप्रतिनिधींनी तिथेच घरून आणलेली शिदोरी सोडून दुपारचे जेवण केले आणि स्वच्छता कंत्राटातील घोळावर दोन दिवसांत लेखी उत्तर न मिळाल्यास तीव्र जनाक्रोशाचा इशारा दिला.
शहरात नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आलेले असताना गल्लोगल्ली कचर्‍याचे ढीग साचले आहेत. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक आणि युवा पदाधिकारी पालिका मुख्यालयात धडकले. आयुक्त दालनात नसल्याचे पाहून सर्वांनी दालनाबाहेरच बैठक मारली. दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वजण वाट पाहत ताटकळत बसले, मात्र आयुक्त आलेच नाहीत. अखेर नगरसेवकांनी आणलेली शिदोरी तिथेच सोडून जेवण केले आणि संताप व्यक्त केला.
शहरातील काही मंडळी स्वच्छतेच्या कामात अडथळा आणत असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी केले होते. यावर आंदोलनकर्त्यांनी कडाडून आक्षेप घेतला. जर कोणी कामात अडथळा आणत असेल तर त्यांची नावे प्रशासनाने उघड करावीत, उगाच नागरिकांवर खापर फोडू नये, असा इशारा त्यांनी दिला.नवीन कंत्राटदारांना जुन्या कंत्राटदारांच्या गाड्या भाड्याने वापरण्याचीपरवानगी करारात आहे का, असा सवाल नगरसेवकांनी केला. या गाड्यांचे मालकी हक्क, भाडेकरार, योग्यता प्रमाणपत्र, विमा आणि चालकांचे परवाने तपासले आहेत का, याची कागदपत्रे तातडीने सादर करण्याची मागणी करण्यात आली. 19 सप्टेंबरपासून सफाई ठप्प पडल्याने संबंधित कंत्राटदारांवर काय दंड ठोठावला आणि बिलातून किती रक्कम कापली, याचे लेखी आदेश दोन दिवसांत देण्याची मागणी झाली.
या आंदोलनात नगरसेवक मनीष बजाज, धीरज हिवसे, चंदू खेडकर, माजी नगरसेवक मुन्ना राठोड, सलीम बेग, महेंद्रसिंह राठोड, प्रकाश बनसोड, प्रदीप बाजड, युवासेना नेते राहुल माटोडे, युवक काँग्रेस नेते समीर जवंजाल, आशिष लुल्ला यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होत

Back to top button