राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला चालणार

पंतप्रधान मोदींवरील टिप्पणी भोवणाार

मुंबई हायकोर्टाने खटला रद्द करण्याची मागणी फेटाळली

मुंबई/8 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी दाखल झालेला मानहानीचा खटला रद्द करण्याची लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (दि.8) फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कनिष्ठ न्यायालयात मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने राहुलगांधी यांना दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर राहण्यापासून सहा आठवड्यांचा दिलासा दिला आहे.गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांना बजावलेल्या समन्सच्या आदेशात कोणतीही बेकायदेशीरता किंवा त्रुटी आढळलेली नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (उीझउ) कलम 482 अंतर्गतातील विशेष अधिकारांचा वापर करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही, असे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले.

Back to top button