कानपूरजवळ प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; 2 वैमानिकांचा मृत्यू

कानपूर/27 ऑगस्ट : कानपूरमधील गंगा बॅरेजजवळ असलेल्या नत्थूपुरवा गावाजवळील एका शेतात आज (दि. 27 ऑगस्ट) दुपारी दुहेरी इंजिन असलेले प्रशिक्षणार्थी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रशिक्षणार्थी पायलटसह इंस्ट्रक्टर (प्रशिक्षक) पायलटचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, असे वृत्त ’पीटीआय’ने दिले आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे विमान ‘गर्ग एव्हिएशन’चे ‘टेक्नम झ2006ढ’ मॉडेल असल्याचे समजते. गर्ग एव्हिएशनच्या कानपूर ताफ्यात या प्रकारचे एक विमान उपलब्ध आहे. तथापि, विमानाचा अधिकृत प्रकार आणि नोंदणी क्रमांकाबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अद्याप अधिकृत पुष्टी व्हायची आहे.

संबंधित बातम्या

Back to top button