रमाई घरकुल योजना तात्काळ पूर्ववत करा

दलित कुटुंबांचा हक्क हिरावल्यास तीव्र आंदोलन छेडणार

अमरावती /12 ऑगस्ट- शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालणारी रमाई आवास योजना 2024-25 या वर्षापासून अचानक बंद करून नवीन उद्दिष्टे देणे पूर्णपणे थांबवले आहे. यामुळे ग्रामीण भागातील हजारो बेघर दलित व नवबौद्ध कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप करत आजाद समाज पार्टीच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय योजनेची प्रतीक्षा यादी खूपच मर्यादित असल्याने स्थानिक पातळीवर गरजू कुटुंबांना घरकुल मिळणे कठीण झाले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रमाई योजनेचे नवीन उद्दिष्ट पूर्ववत मंजूर करावे, अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पार्टीने दिला आहे. हे निवेदन जिल्हाध्यक्ष प्रवीण सु. मोहोड यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी पक्षाचे विक्रम तसरे, नितीन काळे , अंकुश रा. आठवले, शरद प्रे. वानखडे , अमोल र. खंडारे, विजय मोहोड , चंदू स. मोहोड, सुशील वानखडे , रोशन उ. गडलिंग , प्रवीण आ. वानखडे , सतीश दुर्योधन आणि सूरज दि. दांडगे हे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button