विद्यार्थ्यांची माफी मागा, राजीनामा द्या
राहुल गांधींनी सरकारला ठणकावले

शिक्षणव्यवस्थेवर ठेवले बोट
नवी दिल्ली /22 जुलै : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. 22) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला हल्लाकबोल केला. देशातील शिक्षणव्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. देशभरात होणार्या परीक्षांचे पेपर फुटीचे प्रकरणामुळे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. देशभरात आतापर्यत 152 पेपर फुटीचेप्रकरणं झाली आहेत. या पेपर फुटीमुळे जवळपासक साडेसात कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. राहुल गांधीं यांनी नवी दिल्लीतील ’इंदिरा भवन’ येथे पत्रकार परिषद घेत धडकी भरवणारी पेपरफुटीची आकडेवारी सांगितली. आपण शंभर टक्के विद्यार्थ्यांसोबत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. गेल्या दहा वर्षात 152 वेळा पेपरफुटीचे प्रकरणं समोर आली. प्रत्येक महिन्यात पेपर फुटी होत आहे. याप्रकरणात एकावरही कारवाई करण्यात आली नाहीये. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरलेत. धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचं सर्वात मोठ्या मालमत्तेचं नुकसान केलंय. यामुळे प्रधान यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काही दिवसांपासून देशातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. रागात आहेत म्हणून आंदोलन करत आहेत. त्याबाबत पहिलं कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था आहे, जी पूर्ण जगात प्रसिद्ध होती. परंतु देशातील महान शिक्षण व्यवस्था आता उद्ध्वस्थ झाली आहे. 152 पेपर लीक झाले आहेत. गेल्या 10 वर्षांत 300 पण असू शकतात. बर्याचदा पेपर लीक झाले असतील, ते माहीतही पडले नसतील.




