शहरातील वाहतूक व्यवस्था तातडीने सुधारा

चौकाचौकांमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करा

रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणे हटवा

अमरावती/16 जून- शहरातील विविध मुख्य चौकांत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांच्या वेळी मुख्य रस्त्यांवर प्रचंड कोंडी निर्माण होते. रस्ते व फुटपाथवरील व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि रस्त्यांच्या कडेला राहणार्‍या फिरस्त्यांमुळे रस्ते आणखीच अरुंद झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघात घड ण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः राज कमल चौक, इर्विन चौक, राजापेठ, बस स्थानक, चित्रा चौक, चौधरी चौक, गोपाल नगर चौक आणि नवाथे चौक या प्रमुख चौकांमध्ये गर्दीच्या वेळी वाहतूक सुचारू ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, रस्त्यांच्या कडेला आणि रोड डिव्हायडरवर डेरा टाकून राहणार्‍या फिरस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत असून, चौकाचौकांमध्ये कचरा व अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे प्रशासनाने या लोकांचे शहराबाहेर योग्य ठिकाणी तातडीने पुनर्वसन व स्थलांतर करावे, असे सचिन भेंडे यांनी पत्रात नमूद केले आहे. या मागणी पत्रावर उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह मनपातील युवा स्वाभिमान पार्टीचे गटनेते नाना उर्फ ज्ञानेश्वर आमले, नगरसेवक दीपक साहू सम्राट, एड. प्रीति रेवणे, योगेश विजयकर, अर्चना पांडे, प्रियंका पाटणे, नंदा सावदे, प्रशांत वानखडे, डॉ. मढूरा कहाने, महेश मूलचंदानी, सुमती ढोके, रजनी डोंगर, अजय जयस्वाल, गौरी मेघवानी, किशोर जाधव आणि मीरा कांबळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button