वर्ध्यात तुकाराम मुंढें विरुध्द नगराध्यक्षासह जनता उतरली रस्त्यावर

संस्थेची प्रतिष्ठा परत करा, जनतेची मागणी

वर्धा /5 जून: 31 मे ही तारीख वर्धेकरांच्या कायम लक्षात राहील. कारण याच दिवशी अन्न व औषधी प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाने येथील सुप्रसिद्ध गोरस भंडारवर धाड टाकून दूध, दही, तूप व अन्य पदार्थाचे नमुने ताब्यात घेत पुढील आदेक्षापर्यंत कारभार बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईचे समर्थन करीत नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून भेसळ केल्यास कठोर कारवाई करू, असा लेखी ईशारा या अनुषंगाने दिला होता. पण या कारवाई विरोधात संतप्त पडसाद उमटले. त्याचा प्रत्यय आज आला.
मूक मोर्चा आणि लाभलेला प्रतिसाद-या कारवाई विरोधात आज गोरस भंडारच्या मुख्यालयातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच विविध गांधीवादी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी व झळ पोहचलेले नागरिक सहभागी झालेत. ‘ गोरस भंडार वाचवा, वर्धेची ओळख वाचवा ‘, गोरस भंडार नही, विरासत है ‘ असे व अन्य फलक झळकले. मूक मोर्चा शांततेत झाल्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन देण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button