आ.रवि राणा यांच्या हस्ते पशु प्याऊ वाटप

या उपक्रमामुळे वन्यजिव व पाळीव प्राण्यांना मिळणार दिलासा

अमरावती /28 मे: उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे वन्य जीव तसेच पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची बाब लक्षात घेऊन आ.रवि राणा यांच्या हस्ते जंगल परिसरातील रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वन्य जीव व पाळीव प्राण्यांसाठी पशु प्याऊ समर्पित करण्यात आले. या उपक्रमामुळे उन्हाळ्याच्या कडक वातावरणात प्राण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सदर उपक्रमांतर्गत जंगलालगतच्या मार्गांवर तसेच वन्य प्राण्यांची वर्दळ असलेल्या ठिकाणी पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या पशु प्याऊमध्ये सतत स्वच्छ पाणी उपलब्ध राहील याची काळजी घेण्यात येणार असून स्थानिक कार्यकर्त्यांना त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी आ.रवि राणा यांनी सांगितले की, उन्हाळ्यात मानवांसोबतच मुक्या प्राण्यांनाही मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. जंगलातील जलस्रोत आटल्याने अनेक वन्य जीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येतात. अशावेळी त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. या पशु प्याऊमुळे वन्य जीव तसेच पाळीव प्राण्यांना मोठा दिलासा मिळेल. या उपक्रमाचे नागरिक व पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले असून प्राणी संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली. विशेषतः वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वन्य जीवांचे संरक्षण व त्यांच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अधिक राबविण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, वन्यजीव प्रेमी तसेच परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच मानवतेचा संदेशही समाजात पोहोचत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी समाजसेवक गोविंद कासट, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते श्री.नाना आमले, शिक्षण सभापती ड.सौ.प्रिती हर्षल रेवणे, मिनी महापौर श्री.किशोर जाधव, नगरसेवक श्रीमती सुमती ढोके, नगरसेवक श्री.अजय मदनमोहन जयस्वाल, नगरसेवक श्री.दिपक किसनलाल साहु, नगरसेवक श्रीमती नंदा धनंजय सावदे, नगरसेवक सौ.रजनी राजेश डोंगरे, नगरसेवक सौ.गौरी शैलेंद्र मेघवानी, नगरसेवक श्री.महेश धनराज मुलचंदानी, नगरसेवक श्री.योगेश रघुनाथ विजयकर, नगरसेवक सौ.अर्चना अशोक पांडे, नगरसेवक सौ.प्रियंका भुषण पाटणे, नगरसेवक श्रीमती मिराताई कांबळे, अशोक पांडे, संदीप कांबळे, शैलेंद्र मेघवानी, अजय घुले, कळसकर काका आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button