प्रहारचे शिंदे सेनेत विलीनीकरण? बच्चू कडूंना विधानपरिषदेची ‘ऑफर’

बच्चू कडू यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट

विधानपरिषद उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

मुंबई/27एप्रिल  राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक आ. बचू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याच्या अटीवर कडू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, शिवसेनेत अनेक जण इच्छुक असले तरी अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील. विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली असून आ. बचू कडू यांनी आपल्या उमेद वारीसाठी जोर लावला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे माध्य मांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, आ. बचू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली. मात्र, शिवसेनेकडून उमेदवारी हवी असल्यास प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. अद्याप कोणाचेही नाव अधिकृतपणे निश्चित झाले नसून 12 नावांची चर्चा सुरू आहे. नीलम गोर्‍हे यांचे नावही चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करत नाहीत, तोपर्यंत कोणतेही नाव अंतिम मानता येणार नाही.
यावेळी शिरसाट यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. जे लोक वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी बोलता आलेच पाहिजे, असे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महिलांना अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली असून सुशिक्षित नसलेल्या महिलांच्या सोयीसाठी ही सवलत दिली आहे. मात्र, योजनेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत शिरसाट म्हणाले की, गायकवाड यांनी भावनेच्या भरात ते वक्तव्य केले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची कानउघडणी केली आहे. बागेश्वर बाबा यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, संतांनी संस्कृतीवर भाष्य करावे, परंतु चुकीची विधाने टाळावीत. चुकीचे वागणार्‍यांवर सरकार कारवाई करतेच, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button