अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, सरकार लोकशाहीविरोधी

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भास्कर जाधवांचा हल्लाबोल

नागपूर/7 डिसेंबर  – हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत महायुती सरकारच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. सरकारच्या ’एककल्ली, मनमानी आणि भ्रष्ट’ कारभाराचा तीव्र निषेध करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिष देत सरकार वर जोरदार हल्ला चढवत, या सरकारने भ्रष्टा चाराच्या आणि मनमा नीच्या सर्व सीमा ओलां डल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेता नसणे हा संविधानाचा अवमान चहापानाचे निमंत्रण नाकारताना भास्कर जाधव यांनी सरकारवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाची दोन्ही सभागृहातील पदे रिक्त ठेवणे हा संविधानाचा अवमान आहे. हे पद केवळ परंपरा नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यसंख्येची अट असल्याचा सरकारचा दावा ’संपूर्ण खोटा’ असल्याचे सांगत, त्यांनी याबाबत प्रधान सचिवांच्या लेखी उत्तराचा दाखला दिला.

Back to top button