जनतेने विधानसभेतच तुमचा मुडदा पाडलाय

एकनाथ शिंदेंचा पलटवार

-म्हणाले, मेलेल्यांना काय मारणार
मुंबई / 19 जून: दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. इंग्रजी चित्रपट पाहून आले असतील. लंडनला सुट्टीसाठी गेले होते, असे एकनाथ शिंदे मिश्किलपणे म्हटले. ‘मरे हुए को क्या मारना है’, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडलेला आहे. नुसता करून नाही शोर, मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही. त्याला मनगटात ताकद लागते. तोंडात दम असून चालत नाही, मनगटात दम लागतो. तो माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आम्ही तुम्हाला तीन वर्षांपूर्वी दाखवलं आहे. आम्ही तुमचे टांगा पलटी घोडे फरार केलेले आहेत. आमच्या नादाला लागू नका. हा एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय, धर्मवीर आनंद दिघेंचे तालमीतील हे लोक आहेत, हा एकनाथ आहे. आमच्या नादाला कशाला लागता. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. ‘हम किसीको छेड़ते नहीं, लेकिन किसी ने हमें छेड़ा तो हम छोड़ते नहीं.’ जाऊ द्या त्या भंगाराचेही अपमान करू नका. असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता चांगलीच टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
2024 सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला. महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
-हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात
मुख्यमंत्रिपदासाठी ते लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार होणार. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा अधिकारही गमावला. पण त्यांनी हिंदुत्त्व सोडलं नाही. पण बाळासाहेबांचे आम्ही वारसदार म्हणणार्‍यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. अशी टीका शिंदे यांनी केली. बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणार्‍या लोकांना त्यांनी उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. हिंदुत्त्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे ते आता उतावीळ, लाचार झाले आहेत, अशी थेट टीकाही शिंदे

संबंधित बातम्या

Back to top button