विज्ञानाची साथ घेऊन आरोग्य साठी एकत्रित या

शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त मनपा यांचे जागतिक आरोग्य दिनानिमित्य आवाहन

अमरावती/26 एप्रिल: महानगर पालिका अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन दसरा मैदान येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्य विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे उद्घाटक शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त मनपा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आपल्या परिवाराच्या आरोग्य साठी स्वतः आपण निरोगी राहण्यासाठी व्यायाम , आहार व वेळेवर रोग निदान करून करावे व कुटुंबातील व्यक्ती यांना सुद्धा वेळोवेळी आरोग्य बाबत जागृती करावी विश्व जग हे निरोगी राहण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन विज्ञानाची साथ घेऊन निरोगी राहण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे असे त्यांनी जनतेला जाहीर आवाहन केले ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे यांनी मन व शरीरातील प्रत्येक अवयव हा निरोगी राहण्यासाठी आपण रोज स्वतः साठी 30 मिनिट कडून व्यायाम करावा सकस आहार घ्यावा कोणत्याही प्रकारचे रोगाचे लक्षणे दिसल्यास त्वरित आपल्या नजिकच्या शहरी आरोग्य केंद्रात जाऊन रोगाची मोफत तपासणी करावी आपल्या आरोग्य केंद्र येथे रक्त तपासणी , एक्सरे, रोग निदान मोफत केल्या जाते व 105 प्रकारच्या औषधी सुधा मोफत दिल्या जाते ह्या संधीच्या फायदा सर्व शहरातील नागरिकांनी घ्यावा असे संबोधित केले. डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा स्वच्छता राखणे व ज्या ठिकाणी स्वच्छता नांदते तिथे आरोग्य व्यवस्थी राहते उत्तम स्वास्थ राखते व सुखी जीवन राहते डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया कीटक जन्य आजार होऊ नये म्हणून स्वतः आपण जागृत राहून घरातील साचलेले पाणी आठवडांतून एकदा खाली करावे व स्वच्छता राखावी व आपल्या कवितेतून जनजागृती केली कार्यक्रमात डॉ देवेंद्र गुल्हाने वैद्यकीय अधिकारी. डॉ श्वेता घुले स्त्री रोग तज्ञ , डॉ सपना वानखेडे , हैदर अली आरोग्य निरीक्षक ,शशिकांत जैस्वाल शरद सावळे आरोग्य सेवक, दिवाकर बरडे ,बबन खंडारे , बांगर , महेंद्र रामटेके,कवीश्वर निवाणे ,राहुल घुरडे,प्रज्वल कडू आशा वर्कर , आरोग्य सेविका व शेकडो नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button