नर्सेसच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली

जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया ठप्प

* रुग्णसेवेवर झाले प्रचंड परिणाम

अमरावती/23 एप्रिल- कर्मचारी संघटनांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयातील परिचारिका सहभागी झाल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकांच्या अभावामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रिया थांबल्या असून, संपामुळे केवळ तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. परिचारिकांशिवाय आरोग्य विभागाची कल्पना करणे कठीण असते. रुग्णांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते, यामुळे रुग्णालय परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इर्विन रुग्णालयात 90, डफरिनमध्ये 80 आणि सुपर स्पेशालिटीमध्ये 150 परिचारिका संपात सहभागी झाल्याने डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण पडला आहे. कंत्राटी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने रुग्णसेवा सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button