यंदा कमी पाऊस, बळीराजा चिंतेत
भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर

ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार
नवी दिल्ली/13 एप्रिल-भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित नवी दिल्लीत सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. दरम्यान, संपूर्ण देशभरात दीर्घावधी सरासरी 87 सेंटीमीटर राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात अल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे. त्यामुळे एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळं एल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुस्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिस्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.




