अकोली परिसरात किरणची निर्घृण हत्या

दारूच्या नशेत किरकोळ वाद विकोपास

शहर गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक

अमरावती/ 9एप्रिल– शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून केवळ दारू पिण्यावरून झालेल्या एका किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील एका मद्य विक्री केंद्रावर सुरू झालेली बाचाबाची इतकी विकोपाला गेली की आरोपींनी एका 46 वर्षीय व्यक्तीचा पाठलाग करून त्याचा अमानुष छळ करत जीव घेतला.
किरण कमलाकर पुणतांबेकर असे या दुर्दैवी मृताचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृत किरण पुणतांबेकर हे रेल्वे स्थानक परिसरातील एका देशी दारूच्या गुत्त्यावर गेले होते. तिथे दारू पीत असताना त्यांचा आरोपी आकाश अंतराम धुर्वे आणि स्वप्निल साहेबराव चतुर यांच्याशी कशावरून तरी खटका उडाला. मद्याच्या नशेत असलेला हा वाद तिथेच शांत झाला नाही तर आरोपींनी किरण यांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवून त्यांच्यावर पाळत ठेवली. किरण हे जेव्हा तिथून निघाले तेव्हा आरोपींनी त्यांना एका निर्जन ठिकाणी गाठले. तिथे दोन्ही आरोपींनी किरण यांच्यावर हल्ला चढवला. लाकडी दांडके चामडी पट्टे आणि लाथाबुक्क्यांनी त्यांना इतकी भीषण मारहाण केली की किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले. या हल्ल्यात त्यांच्या शरीराच्या नाजूक भागाला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरवस्तीत घडलेल्या या थरारामुळे शहरात दहशतीचे सावट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तातडीने कामाला लागले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांत आरोपींचा माग काढला. आकाश धुर्वे आणि स्वप्निल चतुर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांनी दारूच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता या घटनेचा अधिक तपास करत असून यामागे आणखी काही कारणे आहेत का याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. साईनगरला लागून असलेल्या म्हाडा वसाहतीजवळील क्रिकेटच्या मैदानात एकाची हत्या झाल्याचे आज सायंकाळी समोर आले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. किरण पुणतांबेकर असे मृतकाचे नाव आहे. मैदानातून जाणार्‍या काही नागरिकांना मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेच खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेतल्यावर सदर व्यक्तीची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओळख पटविण्याचे काम सुरू केले. काही वेळाने मृतकाची ओळख किरण पुणतांबेकर या नावाने पटली. बेदम मारहाणीत किरण यांची हत्या झाल्याचा संशय आहे कारण त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात मारहाणीचे व्रण दिसत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण समोर येईल. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मारेकर्‍यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते मात्र गुन्हे शाखेने अवघ्या काही वेळातच आरोपींना जेरबंद करून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे.

सुडाच्या नशेत कुटुंब उद्ध्वस्तरेल्वे

स्थानकावर झालेल्या एका किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी आकाश धुर्वे आणि स्वप्निल चतुर यांनी किरण पुणतांबेकर यांचा जीव घेतला. रागाच्या भरात कायदा हातात घेतल्यामुळे किरण यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांनी कडक वचक निर्माण करण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button