चांदूर रेल्वे नगर परिषदेत तुंबळ हाणामारी
नमो गार्डन विषयाच्या चर्चेवरुन हाणामारीला सुरुवात

नगरसेवकांनी भर सभेत एकमेकांवर उगारल्या खुर्च्या
संतप्त महिलांचा नगर परिषदेत ठिय्या
लाथाबुक्क्यांचे प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात, तपास सुरु
चांदूर रेल्वे /2 एप्रिल: शहराच्या वैभवात भर टाकणार्या ’नमो गार्डन’च्या नियोजित प्रकल्पावरून आज चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या विशेष सभेत लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवण्यात आली. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेल्या वादाने हिंसक वळण घेतले. बघता बघता शब्दाने शब्द वाढला आणि नगरसेवकांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी प्रहार करत सभागृहाचे रूपांतर कुस्तीच्या आखाड्यात केले. या राड्यामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले असून, प्रकरण आता पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यात पोहोचले आहे. चांदूर रेल्वे शहराच्या प्रगतीसाठी आज नगर परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला वातावरण शांत वाटत असले तरी, अजेंड्यावरील ’नमो गार्डन’ला आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय निघताच ठिणगी पडली. भारतीय जनता पक्ष गटाने या उद्यानाच्या मंजुरीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, ’आपलं चांदूर’ गट आणि इतर नगरसेवकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. चर्चेच्या नावाखाली सुरू झालेली ही सभा काही वेळातच आरोपांच्या फैरींनी गाजू लागली. एकमेकांचा उद्धार करत असतानाच नगरसेवकांचा संयम सुटला आणि भर सभागृहात लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. धक्काबुक्कीपासून सुरू झालेला हा प्रकार थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे,संतापाच्या भरात काही नगरसेवकांनी थेट खुर्च्या उचलून एकमेकांवरभिरकावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सभागृहाची शिस्त पूर्णपणे कोलमडूनपडली. या गोंधळाची माहिती शहरात पसरताच रामनगर भागातील शेकडोमहिला आणि नागरिक नगर परिषद कार्यालयावर धडकले. आपल्याविकासकामाला विरोध का केला जातोय, असा संतप्त सवाल करतया महिलांनी थेट सभागृहात प्रवेश केला आणि संबंधित नगरसेवकांचा घेराव घातला. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचीचांगलीच तारांबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणावर नगराध्यक्षा प्रा. प्रियंका
विश्वकर्मा यांनी भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. नमोगार्डनला मंजुरी मिळवण्याऐवजी भाजप नगरसेवकांनी पुन्हा गोंधळ घातलाअसून त्यांचे गटनेते नेहमीच विषयांतर करून असभ्य भाषेत बोलतात आणिमहिलांचा अपमान करतात, असा आरोप करीत त्यांनी या वर्तणुकीला आळाघालण्यासाठी पोलिसांत तक्रार दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, नगर परिषदेचेउपाध्यक्ष बच्चू वानरे यांनी अध्यक्षांवरच नियमबाह्य कामाचा ठपका ठेवलाआहे. तहकूब विषय क्रमांक 12 वर चर्चा सुरू असताना अध्यक्षांनी घेतलेलाआर्थिक व तांत्रिक विषय चुकीचा होता, असे त्यांचे म्हणणे आहे.मुख्याधिकार्यांनी पत्राद्वारे सुचवूनही जागा निश्चितीचा विषय न घेताअध्यक्षांनी चुकीचा विषय रेटला आणि वादाची ठिणगी पडताच त्या सभेचेइतिवृत्त पुस्तक (मिनिट बुक) घेऊन निघून गेल्या, असा दावा वानरे यांनीकेला आहे. या गोंधळाबाबत मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनीही स्पष्टभूमिका मांडली आहे. उद्यानाचे स्थळ आधीच निश्चित झाले असून केवळमंजुरीचा विषय सभेपुढे होता, असे सांगतानाच त्यांनी नगरसेवकांनी 1965च्या अधिनियमानुसार सभागृहाची शिस्त राखणे आवश्यक असल्याचे मत
व्यक्त केले.ज्या सभागृहात जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे, रस्त्यांचे आणि आरोग्याचेप्रश्न सुटणे अपेक्षित असते, तिथेच लोकप्रतिनिधींनी एकमेकांचे कपडेफाडण्यापर्यंत मजल गाठली. या हिंसक प्रकारानंतर दोन्ही बाजूंच्यानगरसेवकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, आता पोलीस या गुंडगिरीवरकाय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेला हा राजकीय तमाशा पाहून सामान्यजनतेतून मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रशासकीय भूमिका: लोकप्रतिनिधींनी नियमांचे भान ठेवावे-आजची सभा हीयापूर्वी तहकूब झालेली सभा होती. उद्यानाचे स्थळ आधीच निश्चित झाले असूनहा विषय केवळ आर्थिक व प्रशासकीयमंजुरी देण्याचा आहे, अशी भूमिकानगराध्यक्षांनी मांडली. यावरूनच गोंधळ होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतपोहोचले. नगरसेवकांनी सभागृहात नगर परिषद अधिनियम 1965 च्यातरतुदींनुसार वागायला हवे. आपले विषय मांडणे हा वैधानिक अधिकार असला,तरी सभागृहाची शिस्त राखणे आवश्यक आहे. यापुढे असे वाद होणार नाहीत,याची सर्वांनी दक्षता घ्यावी. – सुप्रिया टवलारे,(मुख्याधिकारी, नगर परिषद,
चांदूर रेल्वे)




