पुंडलिक महाराज जन्मोत्सवात प्रा.मोहन इंगळे यांच्या भक्ती संगीतचे आयोजन

अमरावती /20 मार्च – श्री समर्थ सद्गुरू पुंडलिक जी महाराज यांच्या जन्मोत्सवात प्रा. मोहन इंगळे यांचे भावस्वरांजली भक्ती संगीत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन 24 मार्च 2026 ला सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत श्री संत पुंडलिक महाराज महा समाधी मंदिर पुंडलिक नगर मुर्तीजा पुर जिल्हा अकोला या ठिकाणी कर ण्यात आलेले आहे. गुरु माऊली पुंडलिक जी महाराज यांच्या जन्मोत्सवा प्रित्यर्थ विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. माऊली कथा, जन्मोत्सव भजन कीर्तन, काल्याचे किर्तन, भजन संध्या, भव्य कृषी प्रदर्शनी व मार्गदर्शन शिबिर, आणि संगीतकार प्रबोधनकार प्रा मोहन इंगळे अमरावती प्रस्तुत भावस्वरांजली भक्ती संगीत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व महाप्रसाद इत्यादी चे आयोजन करण्यात आलेले आहे.




