चित्ररथाच्या संकल्पनेला अपेक्षेनुसार मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उभारली महाकाय दीडशे फुटांची गुढी

अमरावती /20 मार्च ’वंदे मातरम’ या राष्ट्रगानाचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी (150वे) वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी (100वे) वर्ष यावर आधारित एक सांस्कृतिक परिवाराने 2 चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेत सांस्कृतिक संचितासोबतच राष्ट्रीय त्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले. हा दुर्मिळ असा दुग्ध शर्करा योग आल्याने यंदा डोंबिवलीकर परिवाराने याच राष्ट्रीयत्वाच्या विषयाला अनुसरून चित्ररथ साकारले. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि रास्व संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला अपेक्षेनुसार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी. विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. क्रांतिकारी देशसेवक या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा झाली. त्यामध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यांपासून 75 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विजेत्यास 25,000 रु. रोख तर उपविजेत्यास 15,000 पारितोषिके देण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button