कवठा कडू येथे विजेच्या धक्क्याने गाईचा मृत्यू

विद्युत वितरण कंपनीवर शेतकर्‍याचा आरोप

चांदूर रेल्वे /19 मार्च  – तालुक्यातील कवठा कडू या ग्रामीण भागात करंट लागून एका गाईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी निलेश लोमटे यांच्या मालकीची गाय शेत परिसरात असताना विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिला करंट लागला. या घटनेत गाईचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे लोमटे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात निलेश लोमटे यांनी विद्युत वितरण कंपनीवर गंभीर आरोप करत भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. विद्युत ऊर्जा तारेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या गाईचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विद्युत वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button