अमरावती जिल्हातील शाळा अखेर सकाळ पाळीत

माध्यमिक व प्राथमिक विभागात शाळांच्या वेळे बाबत एकवाक्यता नाही

अमरावती /18 मार्च : अमरावती जिल्हातील माध्यमिक व प्राथमिक शाळा उन्हाचा पारा वाढल्यामुळे सकाळ पाळीत घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन केली होती.पण उन्हाचा पारा 42च्यावर गेला तरी जिल्हातील शाळांच्या वेळेत बदल केला नव्हता.पण पालकांचा व लोकप्रतिनिधी आणि शिक्षक संघटना यांची रेटा वाढल्यामुळे अखेल प्रथम माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पञ काढून जिल्हातील माध्यमिक शाळा सकाळ पाळीत 16मार्च पासुन घेण्याचे आदेश शाळांना दिले होते आणि शाळेची वेळ सकाळी 7ते11अशी निर्धारीत केली होती.पण प्राथमिक विभागाचे पञ न निघाल्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागावर समाजातुन रोष व्यक्त होत होता.अखेर आज प्राथमिक शिक्षण विभागाचे आदेश निर्गमित झाले असुन या आदेशात लहान मुलांची शाळा सकाळी 7.15ते12.15 या वेळेत 20मार्च पासुन भरणार आहे.हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थांवर अन्याय आहे.म्हणजे अमरावती जिल्हा परीषद मधिल माध्यमिक व प्राथमिक शाळा भरण्याच्या वेळेत तालमेळ दिसत नाही.अतिशय भोगळ कारभार शिक्षण विभागाचा दिसत आहे.जिल्हातील सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांची वेळ एकच असली पाहीजे.जिल्हातील तापमानाचा विचार करता शाळांची वेळ सकाळी 7ते11अशीच असायला पाहीजे.या शाळांच्या वेळेबाबत शिक्षक संघटना यांनी तिव्र नापसंती व्यक्त केली आहे.म्हणुन प्राथमिक शिक्षण विभागाने सुधारीत आदेश काढुन शाळांच्या वेळेत बदल करावा अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button