भारत-मलेशियामध्ये सहा प्रमुख करारांवर स्वाक्षरी
दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

नवी दिल्ली/8 फेब्रुवारी – मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन दिवसांचा अधिकृत दौरा सुरू केला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदींचा हा तिसरा मलेशिया दौरा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या या दौर्यामुळे भारताच्या अॅेक्ट ईस्ट धोरणाला कशी गती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या उपस्थितीत भारत आणि मलेशियामध्ये सहा प्रमुख करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. कालालंपूरमधील द्विपक्षीय चर्चेदरम्यान, दोन्ही देशांनी सांस्कृतिक, आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्यास सहमती दर्शविली. पंतप्रधान मोदींच्या मलेशियाच्या दोन दिवसांच्या दौर्यात दोन्ही नेत्यांमध्ये व्यापक चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाच्या (चए-) मते, भारत-मलेशिया व्यापक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी ही भेट एक महत्त्वाचा टप्पा ठरती.या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, सेमीकंडक्टर्स, संरक्षण, सुरक्षा, सागरी सहकार्य, ऊर्जा, अक्षय संसाधने, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण, ठिजिटत आणि नवीन तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांचा समावेश होता. पारंपारिक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची सामायिक इच्छा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. कोणत्या क्षेत्रात करार या भेटीदरम्यान अनेक द्विपक्षीय करार आणि सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. यामध्ये सुरक्षा सहकार्य, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सहभाग, सेमीकंडक्टर विकास, आरोग्य आणि औषध, आपत्ती व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारविरोधी सहकार्य यांचा समावेश आहे.




