धामणगाव रेल्वेत जमिनीला हादरे

प्रशासनाकडून अफवांना थारा न देण्याचे कळकळीचे आवाहन

अमरावती /10 जानेवारी : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव आणि कृष्णा नगर परिसरात शनिवारी दुपारी अचानक जमिनीला सौम्य हादरे बसल्याने खळबळ उडाली. काही सेकंद जाणवलेल्या या कंपनांमुळे भीतीपोटी नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण विभागाने हे धक्के भूकंपाचे नसल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शनिवारी दुपारी शांत वातावरणात अचानक जमिनीतून एक लहर गेल्याचा भास रहिवाशांना झाला. घरातील खिडक्या आणि वस्तू हलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरात असताना अचानक भूकंपासारख्या हालचाली जाणवल्या, असा अनुभव पोलीस कर्मचारी महादेव पोकळे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, जे नागरिक कामात व्यस्त होते त्यांना हे हादरे जाणवले नाहीत, मात्र स्थिर बसलेल्या व्यक्तींना ते प्रकर्षाने जाणवले.
तहसीलदार अभय घोरपडे यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती घेतली असता, सेस्मोग्राफवर कोणत्याही भूकंपाची नोंद झाली नसल्याचे समोर आले. हे हादरे नैसर्गिक नसून स्थानिक स्तरावरील मानवी हालचाली किंवा भूगर्भातील तांत्रिक कारणांमुळे असू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. जमीन हादरली पण यंत्र का राहिले शांत- धामणगाव परिसरात जाणवलेले हादरे हे भूकंपाचे नसून स्थानिक मानवी हालचाली किंवा भूगर्भातील अंतर्गत पोकळीत झालेल्या बदलांचा परिणाम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेव्हा भूकंपाची तीव्रता ठराविक मर्यादेच्या पलीकडे नसते, तेव्हा भूकंपमापक यंत्रावर त्याची नोंद होत नाही. म्हणूनच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासकीय सुचनांचे पालन करणे हिताचे ठरेल.
माजी सरन्यायाधीश गवई यांचे हस्ते अ‍ॅड.देशपांडे यांचा गौरव
करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बी. टी. देशमुख होते.समाजातील निराशा, अन्याय आणि असहायतेच्या काळात लोकांच्या बाजूने उभे राहणे सोपे नसते, परंतु अ‍ॅड. देशपांडे यांनी वकिली ही केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर नैतिक व सामाजिक कर्तव्य मानून स्वीकारली. न्यायालयीन परिसरात भीतीने थरथरणार्‍या सर्वसामान्यांना मानसिक आधार देणे, खोट्या ओशासनांऐवजी सहमती व विवेकाचा मार्ग दाखवणे आणि सत्यनिष्ठेची पायवाट सोडू न देणे ही त्यांची कार्यशैली. प्रचंड वाचन,गंभीर अभ्यास आणि विनम्र स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे अन्यायाविरुद्ध लढताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी व विनोबा भावे यांच्या विचारांची प्रेरणा घेतली. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ग्रामीण भागात राहून ग्रामोद्धाराचा अभ्यास केला. विनोबा भावे यांच्या ’साप्ताहिक’ चे ते उपसंपादकही राहिले. त्यामुळे त्यांची लेखणी सामाजिक चिंतनाची आणि मार्गदर्शनाची बनली. विद्यार्थी आंदोलनात, शांती सेना चळवळीत व तरुण संघर्ष वाहिनीत ते सक्रीय राहिले.आणीबाणीच्या काळात सरकारविरोधात संघर्ष केल्याबद्दल त्यांना जवळपास तेरा महिने तुरुंगवासही भोगावा लागला. सत्तेची हाक असूनही त्यांनी राजकारण न स्वीकारता समाजकारण आणि न्यायव्यवस्था याच मार्गाची निवड केली. वकील हा सामाजिक परिवर्तनकर्ता असतो ही बाब बाबासाहेबांनी सांगितली, ती त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली, असे पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले.अमरावतीतील वरिष्ठ न्यायाधीश व वकिलांनी त्यांच्या तत्त्वनिष्ठतेचे विशेष कौतुक केले. त्यांच्यावर इतका विेशास आहे की अमरावतीत ते निवडून निवडले जाणारे मध्यस्थ म्हणून मानले जातात, असा उल्लेखही यावेळी झाला. आजच्या स्पर्धात्मक काळात मूल्याधिष्ठित काम करणार्‍या माणसांची संख्या कमी होत असताना अ‍ॅड. देशपांडे यांचा आदर्श पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही मत पाहुण्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात अ‍ॅड. देशपांडे यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी किशोरी देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या मागे मजबूत सहचारिणीचे योगदान असते, हे या प्रसंगी अधोरेखित झाले.कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीअनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, निवृत्त न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि गांधीवादी विचारवंत पराग चोळकर उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळा समितीचे प्रदीप देशपांडे, विजय कुबडे, सुनील झोंबाडे, अविनाश दुधे, अ‍ॅड. वसुसेन देशमुख, सुनील जयवंत देशमुख, ज्ञानेेशर हिवसे, वैभव दलाल, अ‍ॅड. श्रीकांत खोरगडे, अ‍ॅड. चैतन्य गावंडे व रेवन पुसतकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

संबंधित बातम्या

Back to top button