वैष्णव रामकृष्ण ढोमणे यांचा अनोखा छंद

देश-विदेशातील हजारो नाणी आणि नोटांचा संग्रह

अमरावती /18 डिसेंबर : येथील हर्षराज कॉलनी परिसरातील संतोषी माता कॉलनी येथील रहिवासी असणारे 23 वर्षीय वैष्णव रामकृष्ण ढोमणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशातील नाणी आणि नोटा संग्रहित करण्याचा एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. वैष्णव रामकृष्ण ढोमणे हे वारकरी संप्रदायातील अमरावती येथील युवा कीर्तनकार असून सध्या ते डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अमरावती येथे कनिष्ट लिपीक या पदावर कार्यरत आहेत तसेच शिवाजी विद्यान महाविद्यालय येथे एम एस सी पर्यावरण शास्त्राचे अध्ययन सुद्धा चालू आहे.
संग्रहाची वैशिष्ट्ये:-नाणी: 20 पेक्षा जास्त देशांतील 5000 हून अधिक नाणी त्यांच्याकडे आहेत. यात भारताच्या 2000 नाण्यांचा समावेश आहे. नोटा: 50 पेक्षा जास्त देशांतील 100 हून अधिक नोटांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
व्यवस्थापन: त्यांनी ही सर्व नाणी आणि नोटा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने फाइल्स आणि बॉक्समध्ये जतन करून ठेवल्या आहेत.
छंदाची सुरुवात कशी झाली ?-वैष्णव यांच्या बालपणी त्यांचे पितृछत्र हरवल्यानंतर आई श्रीमती वर्षाताई ढोमणे व आजी शांताबाई वानखडे यांच्यावर वैष्णव यांच्या जडणघडणीची जबाबदारी येऊन पडली. त्यात आई वर्षाताई ढोमणे या प्रशासकीय सेवेमध्ये सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी या पदावर नोकरीवर असल्याने त्यांना पूर्णवेळ वैष्णव यांना देणे शक्य होत नसे. अशा वेळी वैष्णव हे तिसर्‍या चौथ्या वर्गात असताना आई, आजी, मामा, मामी, मोठी आई, मोठे वडील, काका, काकू तसेच घरी कुणी पाहुणे म्हणून मोठी माणसे आले असता वैष्णव यांना नाणी, नोटा यांच्या स्वरूपात काही खाऊ म्हणून त्यांच्याकडून मिळायचा व त्या करकरीत चकाकणार्‍या नोटा, नाणी त्यावरील चित्र यांचं कुतहूल तथा आकर्षण वैष्णव यांना वाटायचं त्या नोटा, त्या नाणी ते खर्च न करता आपल्या संग्रहित ठेवत असत. व त्या बरोबर ते खेळत असत. या सर्व प्रकारातून त्यांना नाणी गोळा करण्याची आवड निर्माण झाली. व विशेष म्हणजे ती आवड तो छंद त्यांनी आज तागायत जोपासला आहे. पुढे नोकरी लागल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पगारातून नाणी आणि नोटा खरेदी करण्यास सुरुवात केली.
इतर महत्त्वाच्या बाबी:-अभ्यास : वैष्णव यांनी केवळ नाणी गोळा केली नाहीत, तर त्यांचा इतिहासही समजून घेतला. यासाठी त्यांनी काही इतिहास संशोधकांची मदत घेतली.

संबंधित बातम्या

Back to top button