काँग्रेसचा ‘मोदी तेरी कबर खुदेगी’चा नारा, दोन्ही सभागृहात गोंधळ

राज्यसभेत राहुल-सोनिया गांधी यांनी माफी मागावी

* दोन वेळा कामकाज ठप्प

नवी दिल्ली /15 डिसेंबर  : काँग्रेस पक्षाने रविवारी (14 डिसेंबर) वी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘वोट चोर गद्दी छोड’ या नावाच्या रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ असा नारा दिला. याचे पडसाद सोमवारी (15 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.
दोन्ही सभागृहांमधील भाजप खासदारांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींविरुद्ध घोषणाबाजीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी मोठा गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले.केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी राज्यसभेत म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांविरोधात अशी घोषणाबाजी करणे, त्यांच्या मृत्यूची कामना करणे हे लज्जास्पद असल्याची टीका केली. तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली. राज्यसभेत ते म्हणाले की, अत्यंत जड अंतःकरणाने मी एका गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वळवू इच्छितो. काँग्रे सच्या रॅली मध्ये पंतप्रधान मोदीं विरोधातील घोषणा ऐकायला मि ळाल्या. ‘मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी’ अशा घोषणा दिल्या. या घोषणां वरून काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि मानसिकता लक्षात येते. अशा विधानांमधून काँग्रेसच्या नामदार नेत्यांची तडफड स्पष्ट झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत उच्चारलेल्या या शब्दांबद्दल सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांची माफी मागायला हवी. असे ते म्हणाले. यानंतर सत्ताधारी खासदारांनी ही मागणी लावून धरली. विरोधकांकडून यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे भाजप खासदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. दुसरीकडे, लोकसभेत केंद्रीय मंत्री किरेन रीजीजू म्हणाले की, 1.4 अब्ज भारतीय तसेच जगातील सर्वात प्रसिद्ध नेत्याला अशा घोषणाबाजीचा सामना करावा लागतो यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते, असे म्हणत टीका केली. लोकसभेतही खासदारांनी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी 11 वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु झाले पण गोंधळानंतर चर्चा 10 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. त्यानंतर कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button