नरसम्मा महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन संपन्न

अमरावती /6 डिसेंबर : श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. याप्रसंगी डॉ. उमेश खांडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. यावेळी डॉ संजयकुमार शामकुवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्ययावर प्रकाश टाकून भारतीय संविधान निर्मितीत त्यांच्या योगदानावर समर्पक भाष्य केले. प्रभारी प्राचार्य डॉ. उमेश खांडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वातील निवडक पैलूंवर भाष्य करतांना त्यांच्यातील शिक्षण घेण्याची जिद्द, त्यांचे बौद्धिक सामर्थ्य व सामाजिक सांस्कृतिक आकलन क्षमता या संदर्भात बद्दल उदाहरणे दिली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन अभ्यासेउपक्रम समितीच्यावतीने करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button