फक्त 15 रुपयांत मिळणार डिजिटल सातबारा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

* तलाठ्यांची मनमानी संपणार

* डिजिटल 7/12 ला कायदेशीर मान्यता

मुंबई/4 डिसेंबर – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी सातबारा (7/12) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शेती करताना सातबारा उतारा महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा सोबत असण्याची गरज असते. या सातबारा उतारासाठी शेतकर्‍यांना सततच्या हेलपाट्यांपासून वाचवण्यासाठी आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवण्याची सुरुवात करण्यात आली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, डिजिटल सातबार्‍याला आता कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. याविषयी शासन परिपत्रक (ॠठ) जारी करण्यात आले आहे. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली असून त्यांनी याविषयीचे आदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. आता फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार आहे. यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरज नसणार आहे. हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. कारण, यासाठी तलाठ्याकडे जाऊन सातबारा उतारा काढायचे म्हटले तर सततचे हेलपाटे मारावे लागतात. शेतकर्‍याची हीच फरफट रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे करोडो शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे सातबारा, 8-अ आणि फेरफार उतारे हे सर्व सरकारी तसेच निमसरकारी, बँकिंग, न्यायालयीन कामकाजामध्ये कायदेशीर आणि वैध असणार आहेत, असे जीआरमध्ये म्हटले आहे, त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे.
महसूल विभागाने जारी केलेल्या नवीन शासन परिपत्रकामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठे बळ मिळाले आहे. एका अधिकृत सातबारा उतार्‍यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत होते आणि ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ होती. या महत्त्वपूर्ण बदलांना कायदेशीर आधार देण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम, 1971 अंतर्गत हे नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत
‘फ्लाइंग क्रेमलिन’वर सर्वाधिक ट्रॅक म्हणून विमानाची नोंद
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. फ्लाइट रडार 24 नुसार, 20000 हून अधिक लोक हे विमान लाइव्ह ट्रॅक करत होते. विमान लँड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना आलिंगन देत स्वागत केले. पुतिन हे दोन दिवसांच्या राजकीय भेटीवर गुरुवारी भारतात दाखल झाले आहेत. एक दुर्मिळ बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी स्वतः दिल्लीच्या पालम विमानतळावर जाऊन रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून भारतासाठी या भेट किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते.

संबंधित बातम्या

Back to top button