नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
बॅरि.आर.डी.आय.के.महाविद्यालयात

अमरावती /3 ऑगस्ट: संपूर्ण भारत देशामध्ये नशा मुक्त युवा निर्माण व्हावे याकरिता केंद्र सरकारच्या वतीने नशा मुक्त युवा फार विकसित भारत हा राष्ट्रीय कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये राष्ट्रिय सेवा योजनेच्या माध्यमातून नशा मुक्त युवा निर्माण होण्याकरिता शपथ घेण्यात आली. त्यासोबतच या सात दिवसांच्या सप्त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. भारत हा जगामध्ये सर्वाधिक युवा असणारा देश आहे. सध्याची परिस्थिती पाहता देशातील युवकांमध्ये अनेक प्रकारच्या वाईट नशा, व्यसन पाहायला मिळतात.
ज्यामुळे आपल्या देशातील युवकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रगती व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. त्यामुळेच संपूर्ण देशामध्ये नशा मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. ज्या माध्यमातून नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानातून विद्यार्थ्यांना कधीही व्यसन करणार नाही अशी शपथ दिल्या जात आहे. सोबतच विविध मान्यवरांच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केल्या जात आहे. बॅरि. आर.डि.आय.के महाविद्यालय बडनेरा येथे सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आयुष्यात केव्हाही नशा करणार नसल्याची शपथ घेतली. हे शपथ राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख डॉ. शितल राठोड यांनी विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी. देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण मुरादे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख पंकज दिंडोकार, वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख संजय थोरात, वाणिज्य विभागाचे प्रमुख नकुल देशमुख, मराठी विभाग प्रमुख पूजा देशमुख, अंकुश मानकर, रुपेश फुके, अमोल ठाकरे आधी उपस्थित होते.




