स्मार्ट मीटर बिलांमुळे आमदार लवटे आक्रमक

अमरावती /9 जुलै– दर्यापूर मतदारसंघातील नागरिकांच्या घरांवर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर लावण्यात आल्यानंतर अनेक गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबांना विजेची अव्वाच्या सव्वा बिले येऊ लागली आहेत. हा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करत क्षेत्राचे आमदार गजानन लवटे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला धारेवर धरले. आ. गजानन लवटे म्हणाले की, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी परिसरासह संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना दरमहा हजारो रुपयांची बिले येतआहेत. काही ग्राहकांना एका महिन्याचे बिल तब्बल 10 हजार रुपयांच्या आसपास आले आहे. त्यामुळे जनतेत तीव्र
असंतोष पसरला आहे. सरकारच्या आवाहनानुसार नागरिकांनी व शेतकर्यांनी कर्ज काढून घरांवर आणि शेतात सोलर यंत्रणा बसवली. मात्र, बिलाचा भार कमी होण्याऐवजी काही सोलर ग्राहकांना प्रतिमहिना 50 ते 55 हजार रुपयांपर्यंत वीज बिले येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजनगाव सुर्जी येथील एका गरीब नागरिकाला स्मार्ट मीटरमुळे 75
हजार रुपयांचे बिल आले. त्याने कष्टाने मूळ रक्कम भरली, तरीही व्याज बाकी असल्याचे सांगून बिलाची दुरुस्ती करण्यात आली
नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेला मानसिक, आर्थिक आणि प्रशासकीय त्रासाला सामोरे जावे आहे. आमदार गजानन लवटे यांनी
या संपूर्ण गैरप्रकाराची तात्काळ सखोल चौकशी करून चुकीची बिले रद्द करण्याची आणि गरीब, मध्यमवर्गीय व शेतकरी
कुटुंबांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दर्यापूर मतदारसंघात वीज घोटाळ्याची चौकशी




