काटेपूर्णा नदीपात्रात मायलेकाचा बुडून मृत्य
मूर्तिजापुर तालुक्यातील समशेरपुर गावातील हृदयद्रावक घटना, दोन महिलांना वाचविण्यात यश

अकोला/11जून : मुर्तीजापुर तालुक्यातील समशेरपुर येथे अधिक मासानिमित्तधार्मिक स्नानासाठी गेलेल्या माय- लेकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली. मुलाचा जीव वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने काळाने दोघांवरही झडप घातली. या घटनेमुळे समशेरया घटनेमुळे समशेरपुर गावात शोककळा पसरली आहे. मृतकांमध्ये वृषाली हरिदास खोत(वय 35) आणि त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत(वय 10) यांचा समावेश आहे व दोन महिलांना वाचविण्यात यश मिळाले.
अधिक मासानिमित्त धार्मिक आंघोळीसाठी काही महिला आणि त्यांच्यासोबत एक मुलगा नदीवर गेले होते. आंघोळ सुरू असताना स्वराजला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलपाण्यात बोलू लागला. मुलगा संकटात असल्याचे लक्षात येताच आई वृषाली खोत यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली.मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि मदतीसाठी आर्त हाक मारू लागले.ही घटना पाहून त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांनी धाडस दाखवत नदीत उडी घेतली मात्र त्याही पाण्याच्या प्रवाहात अडकल्या.नदीकाठी उपस्थित असलेल्या युवकांनी प्रसंगवधान पाण्यात उड्या घेतल्या आणि मोठ्या प्रयत्नानंतर माधुरी खोत व मीरा चौधरी या महिलांना सुखरूप बाहेर काढले, दरम्यान वृषाली खोत व स्वराज खोत यांचा शोध सुरू करण्यात आला.स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली




