भगवान परशुराम भारतातील ऋषी परंपरेचे मार्गदर्शक

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

अमरावती/21एप्रिल: भगवान परशुराम जयंती वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. भगवान परशुरामांनी भगवान शिवशंकरांची कठोर तपश्यचर्या करुन अनेक दिव्य अस्त्रे आणि विद्या आत्मसात केल्यात. परशुराम हे ’ अष्टचिरंजीवी ’ पैकी ( अमर ) एक मानले जातात. त्यांचे मूळ नाव ’ राम ’ होते, परंतु भगवान शिवाने दिलेला ’परशु ’ या शस्त्रामुळे त्यांना ’ परशुराम ’ ( परशु धारण करणारा राम ) म्हटले गेले. भगवान परशुराम हे हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत असून, त्यांना भगवान विष्णुचा सहावा अवतार मानले जाते. ते माता रेणुका आणि ऋषी जमदग्नी यांचे चिरंजीव होते. ज्यांनी पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून ती आज्ञा पालन करण्यासाठी कठोर पाऊल उचलले होते. अशी त्यांची कथा प्रसिद्ध आहे. अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून परशुराम भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचे स्थान ठेवतात. भगवान परशुरामांनी सदैव गुरु आणि आई – वडिलांच्या आज्ञाचे पालन केले. भगवान परशुराम हे भारतातील ऋषी परंपरेचे मार्गदर्शक मानले जातात. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले.रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी त्या भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमरावती येथील राजकमल चौक येथे भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त आयोजित शोभयात्रेचे आगमन झाले असता आमदार – सौ. सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस वंदन – पूजन – नमन करीत त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमे चरणी विश्वमांगल्याची प्रार्थना केली.भगवान परशुराम तसेच गौमातेच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या शोभायात्रेत त्यांनी सहभाग नोंदवित कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सर्व सदस्य व पदाधिकार्‍यांना भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, श्री गौरक्षण संस्था, श्री गौ सन्मान रक्तदान समिती, श्री माहेश्वरी पंचायत, श्रीरामचरितमानस परिषद, अमरावती रक्तदान समिती चे पदाधिकारी व सदस्य तसेच विप्रवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button